yoga

About Yog Vidya Dham

१९८५ साली आदरणीय डॉ श्री विश्वासराव मंडलिक गुरुजी, नाशिक यांच्या प्रेरणेने अहमदनगर येथे योग विद्या धाम संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या योगशिक्षकांनी सेवाभावी व निरपेक्षवृत्तीने ‘योग प्रवेश’ या प्राथमिक वर्गास सुरुवात केली. सोसायटीज रजिस्ट्रेशन कायदा व ट्रस्ट रजिस्ट्रेशन कायद्या खाली संस्थेची रीतसर नोंदणीही झाली.

नाशिकहून प्रशिक्षित होऊन आलेल्या सेवाभावी योग शिक्षकांनी शहरात अनेक ठिकाणी योगप्रवेश वर्ग सुरु केले. त्यानंतर वेळोवेळी संस्थेचे कार्यकर्ते योगशिक्षक नाशिक येथे जाऊन १-१ महिन्याचे वास्तव्य करून पुढील वर्गाचे प्रशिक्षण घेत होते व अहमदनगर येथे त्या पुढील प्रगत वर्ग नगरच्या योगप्रेमींना शिकवत होते. अश्या प्रकारे आजपर्यंत योगप्रवेश वर्गातून १०००० पेक्षा जास्त, योगपरिचय वर्गातून ३०००, योगशिक्षक वर्गातून ८५०, योगप्रबोध वर्गातून ४५०, साधकांनी योगशिक्षण घेतले व आपली प्रगती केली व करत आहेत. संस्थेच्या योगशिक्षक वर्गातून झालेल्या ८५० शिक्षकांपैकी १००-१२५ शिक्षक हे अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असून श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड ह्या भागात योग शिकवण्याचे कार्य करत आहेत.

योग विद्या धाम या संस्थेत १) योग संजीवन, २) योग सोपान ३) योगप्रवेश ४) योगपरिचय ५) प्रबोध ६)शिक्षक ७) अध्यापक हे श्रेणीबद्ध अभ्यासक्रम शिकवले जातात व त्यापुढील नाशिक येथे होणाऱ्या ८) प्रवीण      ९) पंडित १०) योगप्राध्यापक या उच्य अभ्यासक्रमासंबंधी मार्गदर्शन केले जाते. ह्या सर्व अभ्यासक्रमांना आयुष मंत्रालय भारत सरकार ह्यांनी मान्यता दिलेली आहे. या वर्गा शिवाय ११) गर्भवती महिलांसाठी, १२) मुलांसाठी स्मरणशक्ती संवर्धन, १३) उंची संवर्धन १४) तणावमुक्ती, मानसिक शांती, आत्मविश्वास वृद्धी निद्रानाश या वर उपाय यासाठी योगनिद्रा व प्रणवजप १५) मधुमेह १६) दमा १७) स्थूलता १८) उच्चरक्तदाब १९) हृदयविकार १२) पाठीच्या मणक्याचे विकार इत्यादी विकाराने ग्रस्त विद्यर्थ्यांसाठी खास अभ्यासक्रमाचे वर्ग २१) मुखापासून गुद्द्वाराप्रर्यंत सुमारे ३२ फुटाचा संपूर्ण पचन मार्ग शुद्ध करणारा शंखप्रक्षालन वर्ग असे वर्ग चालू असतात. गेल्या १० वर्षापासून महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने योगशिक्षक पदविका परीक्षेचे अधिकृत केंद्र म्हणून योग विद्या धाम अहमदनगर शाखेस मान्यता दिली असून अत्तापर्यंत ४०० साधकांनी पदविका प्रथम श्रेणी व प्रथमश्रेणी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. दरवर्षी दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी उंची संवर्धन व संस्कार वर्ग घेतले जातात. आत्तापर्यंत जवळजवळ १४०० विद्यार्थांनी याचा लाभ घेतला असून त्यांच्या उंचीत एक महिन्यात लक्षणीयरित्या वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

गेल्या ५ वर्षापासून २१ दिवसात हमखास वजन कमी करणारा वर्ग सुरु झाला असून सुमार ७०० साधकांनी आपले वजन २ ते ५ किलो फक्त २१ दिवसात कमी करण्यात यश मिळवले आहे. तसेच २०१४ पासून संस्थेस कालिदास विद्यापीठ रामटेक नागपूर यांनी योगातील B.A. व M.A.  सुरु करण्यास मान्यता दिली असून हे अभासक्रमही शिकवले जातात. हे अभ्यासक्रम UGC मान्यताप्राप्त असल्याने नौकरी मिळण्यास अग्रक्रम मिळतो.

दरवर्षी जागतिक सूर्यनमस्कार दिना निमित्त शाळांमधून जाऊन सूर्यनमस्कार शिकवणे, रथसप्तमीच्या दिवशी एकाच वेळी विविध शाळेच्या मैदानात विद्यार्थी व नागरीकांकडून सूर्यनमस्कार करवून घेणे, महिला दिनानिमित्त महिलांसाठी व जेष्ठनागरिक दिनानिमित्त जेष्ठांनसाठी विनामूल्य योग वर्ग घेणे, जागतिक योगदिना निमित्त आयुष मंत्रालयामार्फत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार व अभासक्रमानुसार मोफत योग वर्ग घेणे असे उपक्रम हि राबवले जातात व या वर्गांना जनतेकडून उत्तम प्रतिसादही मिळतो. त्याच प्रमाणे ओंकार जपाचे वर्ग ठिकठिकाणी आयोजित करून त्याद्वारे उच्चरक्तदाबावर लाभ होतो, स्मरणशक्ती वाढते हे सिध्द करणे, दरवर्षी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा, रक्तदान शिबिरे,निसर्गात सहली,योग दिंडी, गिरी भ्रमण जाहीर व्याख्याने व जाहीर कार्यक्रम, प्रतिष्ठीतांचे घरी जाऊन योगाभ्यास शिकवणे, निसर्गोपचारतील N. C., N.D. वर्गाचे आयोजन करणे इत्यादी उपक्रम चालू असतातच. गेल्या २ वर्षापासून मधुमेह नियंत्रण वर्ग हि सुरु केला आहे. वरील सर्व वर्गाचे अभ्यासक्रम ठरलेले असून शिक्षकाला त्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते व वर्ग घेण्यास परवानगी दिली जाते. प्राणायाम व शुद्धीक्रिया या सारख्या महत्वाच्या व नाजूक प्रक्रिया शिकविण्यासाठी योगशिक्षकास परवानगी देताना शिक्षकाचा अनुभव व योगप्रबोध आणि योग अध्यापक या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच हे वर्ग शिकविण्याची अनुमती मिळते हे योग विद्या धामचे वैशिष्ठ्य आहे.

योगशिक्षक वर्गाचे वैशिष्ठ्य म्हणजे या वर्गात एकच आसन ४ तंत्रातून शिकवणे, टप्याटप्याने शिकवणे, दुरुस्त्या करण्याची पद्धत, पाठ परीक्षेपूर्वी अनेकवेळा सूक्ष्म अभ्यास सराव पाठ तात्त्विक अभ्यासाचे ३६ व्याख्याने याचे प्रशिक्षण घेऊन ५०% पेक्षा जास्त गुण मिळवावे लागतात. याशिवाय मधुमेह,स्थूलता निवारण वर्गावर नियमित पॅथालॉजीकल चाचण्या त्यावरील शोधनिबंध, जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग शिबिरे घेणे, योगशिक्षक निवासी वर्ग घेणे हे उपक्रम हि राबवले जातात शिर्डी, पारनेर, राळेगणसिद्धी येथे योगशिक्षक निवासी वर्ग घेण्यात आले आहेत. एकाच वेळी १०००० पेक्षा जास्त विद्यर्थ्यांकडून करून घेण्याचा उपक्रम ३ वेळा योगपरिचय वर्गावर स्नेहन स्वेदन इत्यादी उपक्रम चालत असतात. योगाचा इतका सखोल अभ्यासक्रम शिकवणारी व तोही योग्य तो दर्जा सांभाळून शिकवणारी आमची योग विद्या धाम अहमदनगर संस्था आहे याचा आम्हाला अभिमान आहे. या संस्थेस नागरिकांनी सर्वाथाने आश्रय देत राहावा, हि विनंती.

In the year 1985, Yoga Vidya Dham Institute was established at Ahmadnagar by the inspiration of respected Dr. Shri Vishwasrao Mandlik Guruji, Nashik. The yoga teachers of the institute started the primary class ‘Yoga Pravesh’ with selfless and selfless attitude. The organization was also duly registered under the Societies Registration Act and the Trust Registration Act.


 Devoted yoga teachers trained from Nashik started Yoga Pravesh classes at many places in the city. After that, from time to time, the yoga teachers of the organization used to go to Nashik for 1-1 months and take training for the next class and teach the next advanced class in Ahmednagar to the yoga lovers of the city. In this way till date more than 10000 from yoga introduction class, 3000 from yoga introduction class, 850 from yoga teacher class, 450 from yoga prabodh class, seekers have taken yoga education and have progressed and are doing so. 100-125 teachers out of 850 yoga teachers of the institute are working in Ahmednagar district and are teaching yoga in Srirampur, Sangamner, Kopargaon, Parner, Srigonda, Karjat, Jamkhed areas.


 In Yoga Vidya Dham institute, 1) Yoga Sanjeevan, 2) Yoga Sopan 3) Yoga Pravesh 4) Introduction to Yoga 5) Prabodh 6) Teacher 7) Teacher are taught and further 8) Praveen 9) Pandit 10) Yoga Professor in Nashik. Course guidance is given. All these courses are approved by the Ministry of AYUSH, Government of India.  Apart from this category 11) for pregnant women, 12) memory enhancement for children, 13) height enhancement 14) yoganidra and pranavajapa for stress relief, mental peace, confidence enhancement insomnia 15) diabetes 16) asthma 17) obesity 18) hypertension 19) heart disease 12) Special curriculum classes for students suffering from disorders like spinal disorders etc. 21) Shankh Prakshalan class which cleans the entire digestive tract from mouth to anus, which is about 32 feet long. Yashwantrao Chavan Open University established by the Maharashtra government since last 10 years has recognized Yoga Vidya Dham Ahmednagar branch as the official center for yoga teacher diploma examination and so far 400 candidates have obtained diploma with first class and first class specialization.

 Every year during Diwali and summer holidays, height enhancement and sanskar classes are conducted for children. Till now almost 1400 students have benefited from this and their height has been observed to increase significantly in one month.  From the last 5 years, the sss class has started with guaranteed weight loss in 21 days and around 700 seekers have succeeded in reducing their weight from 2 to 5 kg in just 21 days.


 Also, since 2014, Kalidas University Ramtek Nagpur has awarded B.A in Yoga. and M.A. Initiation is approved and these Abhaskarams are also taught. Since these courses are UGC approved, it gives priority to get jobs. Every year on the occasion of World Surya Namaskar Day, teaching Surya Namaskar in schools, taking Surya Namaskar from students and citizens simultaneously in different school grounds on Rathasaptami, taking free yoga classes for women on Women’s Day and for senior citizens on the occasion of World Yoga Day, taking free yoga classes according to the guidelines given by the Ministry of AYUSH and in alphabetical order. Such activities are carried out and these classes also get good response from the public. In the same way, Omkar Japa classes are held at various places to prove that it benefits high blood pressure, improves memory, every year district level yoga competitions, blood donation camps, nature trips, yoga dindi, Giri tours, public lectures and public programs, teaching yoga at the homes of dignitaries, N.C. in naturopathy, N.D. Activities such as organizing classes are going on. Diabetes control class has been started since last 2 years.


 The syllabus of all the above classes is fixed and the teacher is given special training and allowed to conduct classes. Yoga Vidya Dham is unique in allowing a yoga teacher to teach important and delicate processes like Pranayama and Shuddhikriya only after the teacher’s experience and passing the Yoga Prabodh and Yoga Teacher exams.

 The specialty of the yoga teacher class is that in this class, teaching in one asana 4 techniques, step by step teaching, method of corrections, many times before the lesson exam, micro study, practice lesson, theoretical study, 36 lectures, you have to get more than 50% marks.
 Apart from this, activities such as regular pathological tests on diabetes, obesity prevention classes, research papers on the same, conducting yoga camps in many places in the district, taking residential classes for yoga teachers are also being conducted. Activities to be done by more than 10,000 students at the same time 3 times in the yoga introduction class activities such as Snehan Svedan etc. are conducted.
 We are proud that our Yoga Vidya Dham Ahmednagar Institute is teaching such an in-depth course of Yoga and that too with the right quality. It is a request that citizens should continue to support this institution.